Breaking News

1 लाख 51 हजार 123 घरांमध्ये जाऊन पडताळणी


सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात निवडणूक कार्यालयाकडून घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करण्यात येत आहे. मे अखेरपर्यंत 11 विधानसभा मतदारसंघातील 10 लाख 54 हजार 132 घरांपैकी 1 लाख 51 हजार 123 घरांमध्ये जाऊन पडताळणी करण्यात आली आहे. यासाठी 3290 मतदान केंद्र अधिकारी नियुक्त केले आहेत. पण मतदार पडताळणी करण्याची मोहीम 20 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने मुदतीत पडताळणी होणार का ? यावर प्रश्‍नचिन्ह आहे. 1 लाख 51 हजार 123 कुटुंबांच्या तपासणीमध्ये 4 हजार 721 जण मृत, 1755 जण कायमस्वरूपी स्थलांतर झालेले, 1280 जणांचे एकापेक्षा अधिक ठिकाणी नावनोंदणी तर 1884 जणांच्या नाव, वय, पत्ता यामध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. दीड लाख कुटुंबांमध्ये 2722 मतदार नोंदणी योग्य असल्याचे आढळून आले. घरोघरी मतदार पडताळणीचा तालुकानिहाय आढावा घेतला असता माळशिरस, बार्शी व पंढरपूर तालुक्यात अनुक्रमे 7 व 9 टक्के इतक्या कुटुंबांची पडताळणी झाली आहे. माढा तालुक्यात सर्वाधिक 23 टक्के कुटुंबांची पडताळणी करण्यात आली आहे. त्याखालोखाल शहर उत्तर, अक्कलकोट मतदारसंघात पडताळणी झाली आहे.