Breaking News

संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून

18 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान अधिवेशन ; तिहेरी तलाक विधेयक मंजुरीची प्रतीक्षा
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनला येत्या 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. मंत्रिमंडळाच्या संसदीय व्यवहार समितीने तारखांची निश्‍चिती केली. 18 जुलै ते 10 ऑगस्ट या तीन आठवड्यांच्या कार्यकाळात पावसाळी अधिवेशन होईल. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या संसदीय व्यवहार समितीची बैठक पार पडली. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजावर पाणी फेरले होते.  लोकसभेचे केवळ 128 तास कामकाज होऊ शकले. तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेच्या मंजुरीअभावी रखडले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मार्गी लागणार का ? याची उत्सुकता आहे.