Breaking News

कोकण पदवीधरसाठी 14 उमेदवार रिंगणात

सिंधुदुर्ग, दि. 20, जून - कोकणातील पाच जिल्ह्याच्या कोकण पदवीधर मतदार संघासाठी 25 जूनला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 21 केंद्रावर 5 हजार 308 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सत्ताधारी भाजप शिवसेना उमेदवारांसह तब्बल 14 उमेदवार नशिब अजमावणार आहेत. 14 पैकी 10 उमेदवार ठाणे जिल्ह्यातील, दोन उमेदवार पालघर आणि दोन रायगड जिल्ह्यातील उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.
विद्यमान आमदार तथा भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे, काँग्रेसचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे तर अपक्ष म्हणून अमोल पवार, अ‍ॅड. अरूण आंबेडकर, कल्पेश किनी, गोकूळ कदङ्क, रती जाधव, डॉमनीका डाबरे, सुवर्णा पाटील, महेश भोईर, मिलिंद कांबळे, सुनिल तोटावाड आणि हिंदूराव रमेश यशवंत असे 14 उमेदवार रिंगणातआहेत.
वैभववाडी 265, देवगड 435, शिरगाव 73, पडेल 125, कासार्डे 111, कणकवली 885, फोंडा 136, आचरा 114, मालवण 306, मसुरे 42, कट्टा 95, कडावल 57, कुडाळ 488, ओरोस 166, माणगांव 154, वेंगुर्ला 342, शिरोडा 97, मळेवाड 57, सावंतवाडी 770, बांदा 208, दोडामार्ग 382 मतदार हक्क बजावणार आहेत. 25 जूनला सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहेत. मतपत्रिकेवर उमेदवारांना पसंती क्रमांक देवून आपल्या मताची नोंदणी करायची असून मतपत्रिकेवर योग्य पद्धतीने क्रमांक न दिल्यास मत अवैध ठरणार आहे.