Breaking News

अहमदनगर महाविद्यालयाचा 12 वीचा 90 टक्के निकाल


अहमदनगर :  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच उपप्राचार्य प्रा.विनीत गायकवाड वपर्यवेक्षक प्रा.शकील सर यांच्या नेतृत्वामध्ये उत्कृष्ठ निकालाची गौरवशाली परंपरा यावर्षी देखील अहमदनगर महाविद्यालयाचे कनिष्ठमहाविद्यालयाने राखली आहे. यावर्षी विज्ञान शाखा 94.64 टक्के, वाणिज्य 90.6 टक्के व कला 72.30 टक़्के तसेच एकूण निकाल 90टक़्के आहे.

अनुभवी शिक्षकांचे प्रभावी अध्यापन तसेच शिस्तबद्ध दैनंदिन अध्यापन व प्रोत्साहन वर्ग याचा विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मोठा वाटाआहे. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणारे विविध उपक्रम यामध्ये दर पाच दिवसानंतर होणारी युनिट टेस्ट, इ-लर्नींग, डीजीटलक्लास रुम, गरजु विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारे रेमेडीयल तास, सर्व परिक्षांचे गुण एस.एम.एस व्दारे पालकांना कळविणे, सर्व परिक्षांच्याउत्तरपत्रिका पालकांना दाखविणे तसेच विद्यार्थ्यांकडे देण्यात येणारे वैयक्तिक लक्ष या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये मोठाहातभार लागत आहे.

यापुढील काळामध्ये कनिष्ठ महाविद्यालय यापेक्षाही अधिक चांगली प्रगती करेल असा विश्‍वास प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस, उपप्राचार्यप्रा.विनीत गायकवाड, व पर्यवेक्षक प्रा.शकील सर यांनी व्यक्त केला.