Breaking News

पेपरफुटी प्रकरणी प्राध्यापकास 10 हजार रुपयांचा केला दंड


सोलापूर, दि. 21, जून - सोलापूर विद्यापीठ बीबीए मुख्य परीक्षेपूर्वीच ही प्रश्‍नपत्रिका सराव परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सोडविण्यास दिलेल्या हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालयातील एका प्राध्यापक ाला दहा हजार रुपये दंड आणि परीक्षा विषयक कामकाजावर बंदी घालण्यात आली. 

बीबीए मुख्य परीक्षेसाठी या प्राध्यापकाने दोन विषयांचा पेपर सेट केला होता. इंटरनॅशनल बिझनेस व ऑर्गनायझेशन बिहेवियर या दोन विषयाचे पेपर या प्राध्यापकाने सेट केला. हे करताना परीक्षा विषयक गोपनीयता बाळगणे अपेक्षित होते. तरीही हीच प्रश्‍नपत्रिका या प्राध्यापकाने हिराचंद नेमचंदमधील विद्यार्थ्यांना सरावासाठी सोडविण्यास दिली. सराव परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांनी विद्यापीठाची मुख्य परीक्षा झाली. या परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका ही यापूर्वीच हिराचंद नेमचंदच्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षेदरम्यान मिळाल्याची माहिती संगमेश्‍वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना समजली. याचा अर्थ परीक्षेपूर्वीच प्रश्‍नपत्रिका फुटली गेली होती. ही परीक्षा रद्द करण्याची मागणीही काही विद्यार्थी संघटनांनी केली. हे संपूर्ण प्रकरण विद्यापीठाने गांभीर्याने घेतले. तातडीने पुनर्परीक्षा घेण्याचे जाहीरही केले. मात्र पुन्हा काही विद्यार्थी संघटना सरसावल्या व फेर परीक्षा न घेण्याची मागणी केली. आंदोलन केले. यावर बेस्ट ऑफ टू चा निर्णय घेत विद्यापीठाने तोडगा काढला.