Breaking News

युतीबाबत चर्चा केवळ उध्दव ठाकरेसोबत : मुख्यमंत्री

मुंबई - शिवसेना आणि भाजपच्या आगामी युतीबाबत शिवसेनेचा कोणताही नेता काहीही बोलत असला तरी त्या बोलण्याला फारसे महत्व नाही. युतीबाबत बोलायचेच असेल तर ते केवळ उद्धव ठाकरे यांच्याशीच बोलले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

दादर येथील भाजप कार्यलयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजप बरोबरच्या युतीबाबत काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते. या विषयी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता, शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे कोणत्याही नेत्याने काही वक्तव्य केले तर आम्ही त्याला महत्व देत नाही. यापुढे कोणतीही राजकीय चर्चा करायची असेल तर केवळ उद्धव ठाकरे यांच्यासोबतच ही चर्चा होईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
एकीकडे पालघरमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये घमासान सुरू असताना दुसरीकदे या दोन्ही पक्षांच्या आगामी निवडणुकीतील युतीबाबतही चर्चा होत आहे. सत्ताधारी असलेल्या या दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत भाष्य करताना शिवसेना आ णि भाजपची युती न झाल्यास राज्यात परत काँग्रेसचे राज्य येईल असे म्हटले होते. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनाकडूनच हे मत व्यक्त केल्याने युती बाबतच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. तसेच भंडारा- गोंदिया आणि पालघर निवडणुकी नंतर याविषयी अधिक बोलता येईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत चर्चेचे संकेत दिले आहेत.