Breaking News

‘मुळा’च्या सुरक्षिततेसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन


राहुरी :  जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाच्या पाण्यात विषारी औषध टाकून मासेमारी होत असल्याचा नुकताच प्रकार समोर आला.त्यानंतर मुळा धरणासह राज्यातील अन्य धरणांबाबत सतर्कता घेण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आला आहे. मुळा धरण सुरक्षिततेबाबत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आला.
मुळा धरण तटाच्या रक्षणासाठी ३० यांत्रिक बोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती शाखा अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली. या पार्श्वभूमीवर तीन बंदूकधारी पोलिस कर्मचारी कायमस्वरूपी मुळा धरणावर तैनात करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मुळा धरणाच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरून पाटबंधारे, पोलिस विभागाचा अहवाल घेत धरणाच्या सुरक्षिततेबाबत उचित उपाययोजना करण्याचा निर्णय

घेण्यात आला. २५ लाख लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या मुळा धरणाच्या पाण्यात विषारी औषध टाकून मासेमारी होत असल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर राज्यातील सर्व धरणांच्या ठिकाणी सतर्कता घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. पाटबंधारे

विभागाकडून धरण सुरक्षिततेचा अहवाल सादर केल्यानंतर ३० यांत्रिक बोट देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कायमस्वरूपी बंदूकधारी पोलिसांचे संरक्षण मिळाल्यास अवैध कृत्याला आळ बसेल, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३ बंदूकधारी पोलिस कायमस्वरूपी मुळा धरणावर नेमण्याचा आदेश देत यांत्रिक बोटी संदर्भाचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. मुळा धरण परिसरात स्क्रॅप असलेले भंगार विकण्यात आले असून त्याचा शासनाकडे भरणा करण्यात आला आहे. 

निधीअभावी चार कॅमेरे बंद 
मुळा धरणावर सुरक्षितता वाढविण्यात आल्याने अवैध मासेमारीसह इतर अवैध कृत्यांनाही बंदी आली आहे. पाटबंधारे विभागाकडून उचित उपाययोजना सुरू झाल्या आहेत. या धरणावर तब्बल २२ ते २५ सी सी टि व्हि कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामधे निव्वळ ४ कॅमेरे सुरु आहेत. इतर कॅमेरेनिधी मिळत नसल्याने बंद आहेत. त्यावर लवकरच उपयोजना करण्यात येणार आहे.
शामराव बुधवंत, शाखा अभियंता, मुळा धरण.