Breaking News

कोकणगांव आणि शिवापूर येथे मोफत गॅस वाटप


संगमनेर :  तालुक्यातील द्रारिद्य्र रेषेखालील गोरगरीब, दीनदुबळ्या महिलांना माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणगांव आणि शिवापूर येथील गरजू लाभार्थ्यांना नुकतेच मोफत गॅसचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रा. बाबा खरात, सरपंच शरद थोरात, शिवाजीराव जोंधळे, कैलास मोकळ, भानुदास जोंधळे, प्रकाश पवार, भाऊराव जोंधळे, रामनाथ पवार आदींसह लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, प्रतिकुलतेतून अनुकुलता निर्माण केलेला कृषी, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांबरोबरच समाजातील सर्व घटकांना विकास प्रक्रियेत बरोबर घेण्यात येत सल्याने राज्यात संगमनेर तालुका आदर्शवत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहचाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात असतो. त्याचाच एक भाग म्हणून कोकणगाव, शिवापूर व माळेगाव हवेली येथील गरजू लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत मोफत गॅसचे वाटप करण्यात आले.