Breaking News

संतांनी एकात्मता आणि मानवता शिकविली : आ. थोरात


संगमनेर :  वारकरी संप्रदाय खूप जुना आहे. सुमारे ७५० वर्षे होऊनही आज समाजात जागृती निर्माण करण्यासाठी, एकता व मानवता टिकून ठेवण्यासाठी संतांचे विचार कामाला येतात. ग्रंथांचे वाचन करत असतांना आदर्श आचरणही व्हायला हवे, हे संतांनी सांगितले आहे. या संप्रदायातील संतांनी मानव समाजाला एकात्मता आणि मानवता शिकविली, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
तालुक्यातील राजमाता जिजाऊ मार्ग (मालदाड़ रोड़) हनुमान शरण काॅलनी येथे मानवता प्रतिष्ठान आणि अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्यावतीने अधिक मासानिमित्त आणि सहकार महर्षि स्व. भाऊसाहेब संतूजी थोरात यांच्या स्मरणार्थ रामायणाचार्य पारस महाराज मुथ्था यांच्या तुलसी रामायन कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. थोरात बोलत होते. यावेळी आ. ड़ाॅ. सुधीर तांबे, राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, नगरसेविका सुनंदा दिघे, जि. प. सदस्य रामहरी कातोरे, ड़ाॅ. नामदेवराव गुंजाळ, आर. वाय. वाकचौरे, दत्तात्रय गड़गे, इंजिनिअर हरिभाऊ चकोर, किसनराव शिंदे, घुलेवाड़ीचे उपसरपंच भाऊसाहेब सातपुते आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रारंभी मानवता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कासार यांनी प्रास्ताविक केले.यावेळी रणजितसिंह देशमुख, आ. ड़ाॅ. सुधीर तांबे यांनी मनोगत केले.

यावेळी पारायण व्यासपीठ प्रमुख ह. भ. प. सिताराम महाराज शिंदे व ह. भ. प. काकड़े यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानवता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सूर्यकांत गुड़ाळ, सचिव भारत कुटे, तात्याराम कढणे, जी. जी. गायकवाड, प्रकाश आरोटे, सोपानराव गुंजाळ, अनिल राहाणे, ह. भ. प. राजू सातपुते, सुधाकर उगले, सतिश दीक्षित, सुरेश फटांगरे, प्रा. एम. वाय दिघे, बाबासाहेब शिरोळे, बाळासाहेब हांड़े, विकास सातपुते, रमेश सातपुते, विजय निर्मळ, अण्णासाहेब नवले, सौरभ कासार, अनिल कासार, दविदास वर्पे आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन मानवता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संदीप सातपुते यांनी केले.