जि.प शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सन्मान
जामखेड तालुक्यातील बसरवाडी येथील जि.प. प्राथमिक शाळा (शिऊर)केंद्र नायगाव, येथे 4 थे वार्षिक स्नेहसंम्मेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेड मार्केट कमिटी सभापती गौतम उतेकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सदस्य डॉ. भगवान मुरूमकर मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष दशरथ कोपनर हे होते. दिपप्रज्वलन मृदुला मुकुंदराज सातपुते मार्शल आर्ट थांगता राट्रीय रोहतक हरियाना येथे संपन्न झालेल्या, रौप्य पदक विजेत्या निकिता पवार यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक किसन वराट यांनी केले. नायगावचे केंद्रप्रमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात शालेय उपक्रमाची माहिती, तसेच शाळेची आयएसओ पासूनची वाटचाल कथन केली. त्याचबरोबर यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रणजित पिंपरे, सुरज पिंपरे, सुरज सुर्वे, शरद फाळके, जिल्हयात रिले स्पर्धेमध्ये तृतिय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच जामखेड येथील ल.ना. होशिंग ज्यु. कॉलेजचे दोन सेवानिवृत्त होणार्या प्रा. हालकुडे, प्रा.वीर यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. सामाजिक राष्टीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक सत्कार मुकुंदराज सातपुते, रवी भापकर, प्रमोद पिंपरे, रामचंद्र गाढवे, शिल्पा साखरे, मनिषा भोरे जिल्हा आदर्श शिक्षक सत्कार सुरेश कुंभार, मंगला रोडे, मंदा पगारे, दत्तात्रय यादव, राम निकम, गोकुळ गायकवाड, राजेंद्र यवले, सिताराम निगुडे, दत्ता भोसले, केशव हराळे, डी.जे. आटकरे, मनोहर इनामदार, विकास बगाडे, हमुमंत निंबाळकर आतापर्यंत तालुक्यातून या चौदा शिक्षकांना जिल्हा पुरस्कार मिळाले म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांचा गौरव करतांना वृक्षांची रोपे देवून केला. हे विशेष मान्यवरांच्या मनोगतात मृदुला सातपुते, मुकुंदराज सातपुते, रवी भापकर, शिल्पा साखरे, दत्तात्रय यादव, राम निकम, गोकुळ गायकवाड, राजेंद्र येवले, माजित शेख, नारायण लहाने या सर्वांनी शाळेचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. तसेच सुरेश कुंभार यांनी शाळेचा उल्लेख तालुक्याची मातृशाळा असा केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुकुंदराज सातपुते, संभाजी कोकाटे महाराज, शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यांनी, तर आभार विजय हुमे यांनी मानले.
