कोठारी प्रतिष्ठानने घेतली करणच्या दोन वर्ष शिक्षणाची जबाबदारी
जामखेड / ता.प्रतिनिधी । आई मुकबधीर तर वडीलांचे कायमचे आजारपण त्यातच घरी अठरा विश्वे दारीद्रय मात्र या सर्वांतून मार्ग काढुन खूप शिकायचे, मोठे व्हायचे असे स्वप्न डोळ्यात पाहुन यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची मनाची तयारी करुन 15 जून पासून सुरु होणार्या नव्या शैक्षणिक वर्षात इ. 9 वीच्या वर्गात शिकण्यासाठी लागणार्या शिक्षणिक साहित्य विकत घेता यावे यासाठी पैसे जमा करण्यासाठी मागील चार दिवसांपासुन गावागावात जावुन अक्षरशः भिक मागण्यार्या जामखेड येथील करण चव्हाण हा गुरुवारी पाटोद्यात आल्यानंतर एका पत्रकाराने त्याची हृदयद्रावक कहाणी जगासमोर आणली व त्यानंतर लगेचच त्याच्या मदतीसाठी येथील कोठारी सामाजिक प्रतिष्ठानने पुढाकाऱ घेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांनी करणच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यास शालेय साहित्य तर दिलेच, त्याचबरोबर त्याची दोन वर्षाची संपुर्ण शैक्षणिक जबाबदारीही घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल ताथेड, महेश बेद्रे यांचेसह करणची आईसह आजी उपस्थित होत्या.
