Breaking News

धारदार शस्त्रांसह तीन आरोपीना केले जेरबंद


संगमनेर : शहर पोलिसांनी मिशन ऑल आऊट अंतर्गत कारवाई करत काल मध्यरात्रीतून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून धारदार शस्त्रांसह तीन आरोपी ताब्यात घेतले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरून मध्यरात्री शहरातील लक्ष्मीनगर भागातून आरोपी निलेश देविदास मोहारे (वय-23) यास त्याच्या राहत्या घरातून एक फूट लांबीचा चाकू व दोन फूट लांबीचा जंब्या अशी दोन धारदार हत्यारे बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर दुसर्‍या घटनेत पहाटे चारच्या सुमारास पोलिसांच्या गस्ती पथकास अकोले बायपास येथील विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे दोन संशयित दुचाकीवरून टेहळणी करताना आढळले असता, त्यांच्याकडे दोन फुटाची धारदार तलवार मिळून आली. 

जालिंदर नवनाथ बर्डे (वय-22) रा. जाफराबाद ता. श्रीरामपूर व सुनील संजय खोडसणे रा. वडाळा महादेव ता. श्रीरामपूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडील असलेले हत्यार आणि पल्सर गाडी क्र. एमएच 14 सीआर 7754 हस्तगत करण्यात आली असून शहर पोलिसांनी या तिघाही आरोपींविरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस कर्मचारी विजय खाडे व दत्तात्रय गोरे करीत आहे