विमान अपघातात ११० ठार; क्युबाचा दुजोरा
वृत्तसंस्था। हवाना
क्युबात गेल्या शुक्रवारी हवाना विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या विमानाला काही वेळातच अपघात झाला हाेता. या अपघातात एकूण ११० जण ठार झाल्याच्या वृत्ताला क्युबा सरकारने रविवारी दुजोरा दिला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये क्युबामधील ९९ नागरिकांचा समावेश अाहे. कॅरेबियन बेटावर गत ३० वर्षांतील ही सर्वात माेठी विमान दुर्घटना अाहे.
या विमान अपघातामुळे क्युबात शनिवारपासून दाेन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात अाला असून देशाचा ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात अाला अाहे. ठार झालेल्यांची अाेळख पटवण्याचे काम सुरू असून अातापर्यंत १५ जणांची अाेळख पटली आहे.