मतदार याद्या अद्यावतीकरण दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहिम
येत्या डिसेंबरच्या आसपास लोकसभा निवडणूकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोग आत्तापासूनच कामाला लागला आहे. पहिल्या टप्यात अधिकारी व सहाय्यक अधिका-यांना मतदार यादी अद्यायावतीकरणासह बदलले नियम तसेच इतर बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुढच्या टप्यात प्रशिक्षण घेतलेल्या अधिकार्यांनी मतदान केंद्र अधिका- यांना प्रशिक्षित करायचे आहे. दरम्यान, येत्या मंगळवारपर्यंत (दि. 15) प्रशिक्षणाचा टप्पा संपविणे आवश्यक आहे.
त्यानंतर मतदान केंद्र अधिका-यांनी घरोघरी भेट देत मतदारांची माहिती गोळा करायची आहे. यामध्ये मतदाराचे नाव, पत्ता तसेच त्याचा यादीत रंगीत छायाचित्र आहे की नाही हे तपासायचे आहे. जेथे दुरूस्ती असेल तेथे मतदारांकडून आवश्यक ती कागदपत्रे जमा करून घ्यायची आहेत. घरोघरी मतदार याद्या शुद्धीकरणाची प्रक्रिया 20 जूनपर्यंत चालणार आहे. दुसर्याच दिवशी म्हणजे 21 तारखेपासून जिल्ह्यातील प्रत्येक मतदार केंद्राची पाहाणी करायची आहे.
दरम्यान, एक ते 31 ऑगस्ट याकाळात मतदारसंघनिहाय यादी अद्यायावयत केली जाईल. 1 सप्टेंबर रोजी मतदारसंघनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यादी प्रसिद्ध झाल्यापासून मतदारांना त्यावर हरकती व दूरूस्ती नोंदविता येईल. हरकती व दुरूस्ती दाखल करण्यासाठी 31 ऑक्टोबर अंतिम मुदत असेल. दाखल झालेल्या हरकतींचा निपटारा 30 नोव्हेंबरपर्यंत करायचा आहेे. हरकती व दुरूस्ती करून 3 जानेवारी 2019 पर्यंत अंतिम मतदार यादीचे छपाई करणे आवश्यक आहे. 4 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.