Breaking News

ग्रामविकास संघटनेच्या बक्षिसाचे कर्जतला वितरण

कर्जत तालुक्यातील कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थीनींना कर्जत येथे सन्मानित करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार मच्छिंद्र अनारसे यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले.

कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व, चित्र रंगवा, विविध गुणदर्शन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतून कर्जत येथील सौ.सो.ना.सोनमाळी कन्या विद्यालयातील वैष्णवी अनिल जाधव या विद्यार्थीनीने द्वितीय क्रमांक संपादन केला. या विद्यार्थीनीस ट्रॉफी, 1501 रुपये रोख व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पालक महानंदा जाधव, प्रा. सोमनाथ गोडसे, भाऊसाहेब तोरडमल, ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुभाष माळवे, भास्कर भैलुमे, मोतीराम शिंदे, विनायक ढवळे, अरुण लाळगे, डॉ. ज्ञानेश्‍वर जगताप, डॉ. शबिना शेख, किरण समुद्र, बंडू सुपेकर, प्रा. किरण जगताप आदी उपस्थित होते.