Breaking News

अपघातातील आरोपी अमेरिकी राजदूताने पाकिस्तान सोडले


वृत्तसंस्था । इस्लामाबाद । वॉशिंग्टन रस्ता अपघातातील आरोपी अमेरिकी राजदूत कर्नल जोसेफ हाल यांनी पाकिस्तान सोडले आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार हाल सोमवारी रात्री विशेष विमानाने अफगाणिस्तानला रवाना झाले. अमेरिकेने हालविरुद्ध अमेरिकी कायद्यानुसार खटला चालवण्याचे पाकिस्तानला आश्वासन दिल्याचे प्रसारमाध्यमाच्या वृत्तात म्हटले आहे.