महिला सक्षमीकरणासाठी व्यावसायिक उपक्रमांची गरज ः पवार
नगर । प्रतिनिधी - शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात बचत गट ही चळवळ मोठ्या प्रमाणात रुजत असल्याने महिलांमधील आत्मविश्वास वाढतांना दिसत आहे. शासनानेही महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या असल्याने त्यांना आपली प्रगती साधता येत आहे. शासनाच्या ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध व्यावसायिक उपक्रम संस्थेच्यावतीने राबविले गेले. त्यातून महिलांनी स्वयंरोजगार निर्मिती करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जन शिक्षण संस्थेचे संचालक बी. आर. पवार यांनी केले.
