Breaking News

44 कलमी कार्यक्रमाला पुढील आदेशापर्यंत मुदत वाढ ; शिक्षक भारतीच्या प्रयत्नाला यश


शालेय शिक्षण विभागाने समग्र शिक्षा अभियानाची माहिती भरण्यासाठी 25 एप्रिलची मुदत दिली होती. त्यामुळे राज्यभर गोंधळ उडाला होता. दरम्यान शिक्षक भारतीने शिक्षणमंत्री यांची भेट घेऊन याला स्थगिती द्यावी किंवा मुदत वाढ द्यावी. आता उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शासनाकडे करण्यात आलेली मागणी व शिक्षकांचा असंतोष लक्षात घेता. 44 कलमी माहिती अद्ययावत करण्यासाठी पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी दिली.

शालेय शिक्षण विभागातील विविध योजना एकत्र करुन समग्र शिक्षा अभियान योजना निर्माण करण्यात आली. 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून हि योजना कार्यान्वीत होत असल्याने या योजनेसाठी माहिती तयार करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले होते. तब्बल 44 मुद्यांची बारक-सारीक माहिती पोर्टलवर भरण्याचे आदेश देण्यात आले होते. शाळांचे काम सोडून हि माहिती भरणे अडचणीचे झाले होते. त्यातच शालाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध करण्याचे काम सुरु झाले आहे. व हि माहिती भरण्यासाठी खुप मुदत देण्यात आली होती. यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. हाच विषय घेवुन शिक्षक भारती संघटनेने शिक्षक आमदार कपिल पाटील,शक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक नेते सुनिल गाडगे,कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उच्च माध्यमिकचे अध्यक्ष जितेंद्र आरु, विजय लंके, शरद धोत्रे, सुनिल जाधव, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे यांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्हाध्यक्ष प्रदिप रुपटक्के, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर, कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी, सचिव विभावरी रोकडे, जया गागरे, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, लता पठारे-घाडगे, बेबीनंदा लांडे, ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष विलास गाडगे, माधवी भालेराव, श्रीकांत गाडगे, संभाजी चौधरी, बापुसाहेब गायकवाड, सिताराम बुचकुल, संपत लबडे, जॉन सोनवणे, अशोक धनवडे, नवनाथ घोरपडे, काशिनाथ मते, शैला कुटीनो आदींनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देवुन चर्चा केली असता. त्यांनी सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेवुन त्वरीत कारवाई केली. व 44 कलमी कार्यक्रमाला बेमुदत मुदत वाढ देण्यात आली आहे, असेही शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

सग्रम प्रणालीद्वारे मागवीण्यात आलेली माहिती अधिच पोर्टलवर टाकण्यात आलेली आहे. शिक्षकांवर अधिच अतिरिक्त कामांचा बोजा असल्याने हा अधिकाचा ताण वाढला आहे. नवनवीन कल्पाना शोधुनही परिणाम मात्र साध्य होत नाही. शिक्षण क्षेत्रात शासनाचे नवनवीन प्रयोग सुरु आहेत. लिपिक वर्गीय कामे करणे, ही जबाबदारी कार्यलयीन असून शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदे मात्र शासन भरायला तयार नाही. अशातच 44 मुद्यांची माहिती भरायची कशी असा प्रश्‍न शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी शिक्षणमंत्र्यांच्या लक्षात आणुन दिले. त्यावर त्यांनी तात्काळ निर्णय घेत माहिती तुर्त पुढील आदेश येईपर्यंत 44 कलमी कार्यक्रम सध्या रद्द करण्यात आला आहे, असे सांगितले