नगर । प्रतिनिधी - सध्या लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच मोबाईल, टीव्ही, इंटरनेटचे व्यसन लागले आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक गोष्टींपासून आपण सर्वजण दुरावत चाललो आहोत. चांगले जीवन जगण्यासाठी सर्वांनी पुन्हा जुन्या गोष्टींकडे वळणे आवश्यक असून त्या आत्मसात केल्या पाहिजेत. पारंपरिक नृत्य मनाला आनंद देणारे आहे. सिडस् डान्स अॅकॅडमीने पुढे येवून सर्व वयोगटातील नागरिकांकरिता आयोजित केलेल्या विशेष समर कॅम्पच्या माध्यमातून पारंपरिक लावण्यांसारख्या नृत्याचे प्रशिक्षण देऊन चांगला उपक्रम राबविला आहे. अशा चांगल्या उपक्रमांना बोज्जा कुटुंबीय कायम सहकार्य करेल, असे प्रतिपादन नगरसेविका वीणा बोज्जा यांनी केले.