Breaking News

जनार्दन स्वामी महर्षि विदया मंदीरचे सुयश


कोपरगाव : येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षि विदया मंदीर, कोकमठाण पंचक्रोशीतील गेल्या वीस वर्षांपासून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. नुकताच सी. बी. एस. ई. बोर्ड नवीदिल्लीचा इ. १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या विदयालयाचा इ. १२ वीचा निकाल याही वर्षी १०० टक्के लागला आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेमध्ये अनिरुध्द जयप्रकाश पांण्डेय याने ८८. ६ टक्के गुण घेत प्रथम क्रमांक मिळविला. तर पुष्कर रमेश दाणे याने ८२. ६ मिळवत द्वितीय, वैष्णव शरद जगताप 79 {तृतीय}, करिश्मा मुनीश बंब ७८. २ {चतुर्थ}, किरण राजेंद्र औताडे ७५. ४ {पाचवा} तर वाणिज्य शाखेत अक्षदा माधवराव बोमी {६३ : २ } गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. 
या निकालामुळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे यांनी दिली. सर्व गुणवंत विदयार्थ्यांचे विदयालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहन चव्हाण, सर्व विश्वस्त, पा्रचार्य राजेंद्र पानसरे, पर्यवेक्षिका जे. के. दरेकर व सर्व शिक्षकवृदांनी अभिनंदन केले. या सर्व गुणवंत विदयार्थ्यांना जयप्रकाश पांडेय, बाळासाहेब बढे, स्वप्निल पाटील, अंनत बज, कैलास कुलकर्णी, अनिता वरकड यांचे मार्गदर्शन लाभले.