Breaking News

‘आत्मा मालिक’कडून ५ लाखांची शिष्यवृत्ती


कोपरगाव : येथील विश्वात्मक जगंली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक या शैक्षणिक व क्रिडा संकुलाच्यावतीने राज्यभरातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना ५ लाख रोख रुपयांच्या रक्कमेची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, अशी माहिती आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी दिली.
ते म्हणाले, करिअर करण्यासाठी विविध स्पर्धा व प्रवेश परीक्षांची तयारी शालेय स्तरापासूनच सुरू करणे आवश्यक आहे. आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये शालेय स्तरापासूनच विविध शिष्यवृत्ती परीक्षांचे स्वतंत्र मार्गदर्शन केले जात आहे. त्याचाच परिपाक म्हणजे एनटीएस, नवोदय, एनएमएमएस आदी जवळपास २८ प्रकारच्या परीक्षांमध्ये आत्मा मालिकचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान पटकावत आहे.

यासंदर्भात प्राचार्य निरंजन डांगे म्हटले, शिष्यवृत्ती परीक्षांबरोबरच विद्यार्थ्यांचे करिअर घडावे, या दृष्टीकोनातून त्यांच्याकडून इयत्ता ८ वीपासूनच नीट, जेईई, एनडीए, एनटीएस आदी परीक्षांची तयारी करून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच या वर्षापासून आत्मा मालिकने खास आयआयटीएन टिचर्स मार्फत या वर्षापासून फाउंडेशन बॅचची सुरूवात केली आहे. हे आयआयटीएन शिक्षक इ. ८ वी पासूनच विद्यार्थ्यांची आयआयटी, नीट आदी परीक्षांची तयारी करून घेणार आहेत.