यादववाडीच्या लोकनियुक्त सरपंचपदी मीना यादव
सुपा : यादववाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिना सुभाष यादव यांनी एकहाती विजय संपादन करत यादववाडी ग्रामपंचायतीच्या पहिल्याच लोकनियुक्त निवडणुकीत सरपंच होण्याचा मान मिळवला.
या निवडणुकीत माजी सरपंच संतोष यादव, अरविंद यादव यांच्या आघाडी मंडळाने सरपंच पदाच्या निवडणुकीत एकतर्फी यश मिळवत सरपंच पदाची धुरा हाती घेतली. 9 पैकी 4 सदस्य निवडून आले मात्र 5 सदस्य निवडून आणण्यात अपयश आले, या ठिकाणी विरोधी मंडळाचे 5 सदस्य विजयी झाले. यादववाडी येथे नवनिर्वाचित सरपंच मीना यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मीना यादव म्हणाल्या की, माजी सरपंच संतोष यादव, अरविंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी मी कटिबध्द असुन गावात सुरू असलेला विकासाचा गाडा असाच सर्वांना विश्वासात घेवुन पुढे नेण्याचा मनोदय व्यक्त केला.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे-
मीना यादव - सरपंच,
तुषार गोटे - सदस्य, अरविंद यादव,
अर्चना ठोंबरे, अतुल तरटे, सीमा गुलदगड, रुपाली शेळके, नीलेश यादव, प्रियंका यादव, सुनीता यादव.
