महापुरूष मानवंदना महोत्सव 2018
जवळा : जवळा विकास सहमुहाच्या वतीने आयोजित महापुरूषांना मानवंदना महोत्सवाचे जि.प. प्राथ. शाळेसमोरील मैदानात शाहीर शीतल साठे आणि सचिन माळी यांच्या क्रांती जलशाने शिवभक्तांना प्रबोधनाची पर्वणी दिली.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांचा यावेळी गुणगौरव व विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यूपीएस्सीमध्ये भारतात 96 वी रैंक मिळविल्याबद्दल मयूर कथवटे यांना विशेष गुणगौरव करून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार- पल्लवी हजारे महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार - पी. यु. जाधव प्रगतशील शेतकरी पुरस्कार - अनिल माताने
उत्कृष्ट दूध उत्पादक पुरस्कार - सुभाष रोडे
सामाजिक कार्य पुरस्कार- संजय कोठारी,
युवा उद्योगजक पुरस्कार- रणजीत पाटील
आदर्श सरपंच पुरस्कार - करमाळा तालुक्यातील पाडळी येथील सरपंच गौतम ढाणे
उत्कृष्ट महिला बचत गट पुरस्कार- ज्ञानेश्वरी महिला बचत गट, युवा व्यावसायिक पुरस्कार- विक्रांत मंडलेचा
सांस्कृतिक संघर्षाची चळवळ आपण अधिक जोमाने लढण्याचा संदेश साठे यांनी दिला. नक्षलवादी ठरविल्याने चार वर्षे तरूंगवास भोगावा लागलेले सचिन माळी यांनी ‘लोकशाही’ वर कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावता हजारे यांनी तर, सूत्रसंचालन अशोक पठाडे यांनी केले. तसेच आभार प्रफुल्ल कोकाटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण हजारे, मुकुंद रोडे, विशाल मते, संदीप शिंदे, अशोक हजारे, नितिन म्हसवडकर, रोहित हजारे यांनी परिश्रम घेतले.
