Breaking News

अग्रलेख - राजकारणांचा घसरता दर्जा !

कर्नाटक निवडणूकातील राजकारणांचा ज्वर वाढत चालला असून, राजकीय टीका टिपण्णींची पातळी देखील सातत्याने खालवत चालली आहे. भारतीय राजकारणांचा असा ऐतिहा सिक, सांस्कृतिक, वैचारिक असा वारसा आहे. त्यामुळे सत्ताधारी असो की, विरोधक यांनी नेहमीच टीका टिपण्णी वैयक्तिरीत्या आणि खालच्या पातळीवर जाऊन कधी केली नाही. 

मात्र आता भारतीय राजकारणांचा पोत बदलत चालला असून, सत्ता मिळविण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचे दर्शन कर्नाटक निवडणूकांत होतांना दिसून येत आहे. भारताच्या संसदीय लोकशाहीतील सर्वात मोठे आणि महत्वाचे पद म्हणजे पंतप्रधान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँगे्रसवर टीका करतांना, काँगे्रसने बागलकोटच्या कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी, असे विधान करून आपल्या पदाचा अवमान करून घेतला आहे. पंतप्रधान यावेळी म्हणाले की, ज्यांना देशभक्तीच्या नावाने त्रास होतो, देशभक्तीच्या चर्चे विरोधात आहेत किंवा ज्यांना देशभक्ती आवडत नाही, त्यांना मी सांगतो, की तुम्हाला दुसर्‍याकडून शिकायचे नाही तर नका शिकू. मग ते तुमचे पूर्वज असो किंवा काँग्रेस. मात्र, बागलकोटच्या मुधोल कुत्र्यांकडून तरी शिकण्याचा प्रयत्न करा अशी खालच्या पातळीवरील टीका त्यांनी यावेळी विरोधकांवर केली. पंतप्रधान पदाचे काही संकेत आहेत. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या वेळेस पंतप्रधान जास्त सभा घेत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळे संकेत मोडीत काढत गुजरात विधानसभा निवडणूकांच्या वेळी जसा गुजरातमध्ये तळ ठोकला होता, तसाच तळ आता कर्नाटकामध्ये देखील ठोकला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ कर्नाटकातील निवडणूकांच्या नि मित्ताने ठिकठिकाणी सभा घेतांना दिसून येत आहे. कर्नाटकची विधानसभा भाजपाने प्रतिष्ठेची करून टाकली आहे. कर्नाटक निवडणूकांचे निकाल हाती आल्यानंतर वर्षभरांच्या आतच लोकसभा निवडणूकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कर्नाटक निवडणूका या लोकसभाचे निकाल ठरवतील. कर्नाटकात ज्या पक्षाची सरशी होईल, तो पक्ष पुढील लोकसभा निवडणूकांत बाजी मारेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या चार वर्षांतील कामगिरी चांगली असून आपण विकासाच्या दिशेने झेप घेतली असल्याच्या दावा भाजप या निवडणूकांत करतांना दिसून येत नाही. याउलट भाजप पुन्हा पुन्हा काँगे्रसवर टीका करत आहे. त्यामुळे कर्नाटक निवडणूक ही विकासांच्या दिशेने जातांना दिसून येत नाही. याउलट विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप या पक्षांचा अभ्यास करण्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे. पंतप्रधान मोदी कधीही विकासाच्या बाबतीत चर्चा करतांना दिसून येत नाही. तर विरोधकांवर थेट टीका करून, विकासाच्या मुदद्यांवरून दुसरीकडे दुर्लक्ष वेधतात. विरोधकांनी केलेल्या टीकेमुळे मोदी व्यथित होत नाही. याउलट ते विरोधकांवर आसूड ओढत, त्यांच्या टीकेतील हवा काढून घेतात. विकासाचे तकलादू तुणतुणे वाजवत, इतिहासाचा विपर्यास करीत, आपल्या ‘अगाध’ ज्ञानाचे प्रदर्शन क रत व काँग्रेस पक्षाच्या कारकीर्दीतील भ्रष्टाचारावर बेलगाम आरोप मोदी करत सुटले आहेत. मात्र मोदी यांच्या भाषणात आत्मस्तुती, प्रौढी, दिशाभूलपणा आणि खोटेपणा ओतप्रोत भरलेला असतो. अर्थातच मोदी यांच्या कारभारावर टीका करण्याची, उणिवा काढण्याची, एकचालुकानुवर्तीत कारभाराला लक्ष्य करण्याची नामी संधी विरोधकांकडे आहे. मात्र प्रभावी नेतृत्व आणि वक्तृत्वाअभावी मोदी यांच्यावर टीकेची धार टोकदार करता येत नाही. मुख्यत: ज्या पक्षाला जसे नेतृत्व लाभेल तसे पक्षातील नेते काम करत असतात.