Breaking News

छत्रपती संभाजी राजांचे विचार डोक्यात घ्या : ह. भ. प. तळपे


राहुरी :  अठरा पगड जातींना संघटित करुन छत्रपती शिवरायांनी जे रयतेच स्वराज्य निर्माण केल, ते स्वराज्य छत्रपती संभाजी राजांनी समर्थपणे सांभाळले. वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत भाषेतून चार ग्रंथ लिहिणारे, सतरा भाषेवर प्रभुत्व असणारे, हयातीत एकही लढाई न हरणारे खरे संभाजी राजे आम्हाला इतिहासातून कळु दिले नाहीत. शत्रू आणि मित्र यांची जाणीव होण्यासाठी तरुणांनी संभाजी राजांचे विचार डोक्यात घ्यावे, सारे प्रतिपादन ह. भ. प. तळपे महाराज यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीनिमित्त {दि.१४} तालुक्यातील डिग्रस येथे प्रबोधनपर किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित भाविकांना संबोधित करतांना ते बोलत होते. 

याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य सचिन भिंगारदे, बाभळेश्वर दूध संघाचे संचालक रावसाहेब पवार, लोकनियुक्त सरपंच पोपट बर्डे, उपसरपंच अनिल शिंदे, ज्ञानेश्वर भिंगारदे, संदिप ओहोळ, रावसाहेब पवार, राजू बेल्हेकर, आरपीआयचे अध्यक्ष नंदू पवार, युवराज भिंगारदे, दत्ता बेल्हेकर, राहुल भिंगारदे, राहुल पटेकर, अनिल पवार, प्रदिप साळवे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. प्रारंभी अनिल पवार यांनी प्रास्तविक केले. सुत्रसंचलन संजय संसारे यांनी केले. यावेळी परिसरातील युवक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.