Breaking News

मत्स्य व्यवसायास शेती क्षेत्राचा दर्जा मिळावा : महादेव जानकर


नवी दिल्ली : मत्स्य व्यवसायास शेती क्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्याचे मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी  केली.
कृषी मंत्रालयात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग यांच्या अध्यक्षतेत समुद्री किनारी राज्य असलेल्या मत्स्यविकास मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात राज्यांचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत श्री. जानकर यांनी ही मागणी केली.

मत्स्य व्यवसायाला शेती क्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यास अनेक सुविधांचा लाभ या क्षेत्राला मिळू शकतो. तसेच मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती आणि आर्थिक उत्पन्नातही भर होईल. असे मत श्री. जानकर यांनी मांडले. मत्स्य क्रांतीसाठी अनुदान निधीची रचना 60:40 या प्रमाणात आहे. ही बदलून त्या ऐवजी 50:50 करण्यात यावी. हार्बर योजनेचा विकास अधिक चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी केंद्र आणि राज्याचा वाटा 50:50 प्रमाणात असावा. केंद्राकडून मासेमारी नौकांसाठी मिळणारी डिझेल सबसिडी महाराष्ट्राला मिळत नसून ही सबसिडी महाराष्ट्राला उपलब्ध व्हावी, अशा मागण्या श्री. जानकर यांनी बैठकीत केल्या.