Breaking News

आश्वी खुर्दच्या दोन चिमुकल्यांचे मातृत्व हरपले ! जागतिक मातृदिनीच काळाचा घाला


आश्वी : जन्म देणाऱ्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी {दि. १३ } मातृदिनाच्यानिमित्ताने एकीकडे व्हॉट्सअ‍ॅपवर शुभेच्छा व आईच्या महतीचा अक्षरश: वर्षाव सुरु होता. मात्र त्याचवेळी दुसरीकडे यावेळी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील मनिषा शिंदे यांच्या निधनामुळे ऐन मातृदिनीच दोन चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले. घटनेची बातमी सोशलमिडियावर व्हायरल झाल्याने आश्वीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आश्वी खुर्द येथील तरुण प्रगतशील शेतकरी दिपक शिंदे यांची पत्नी मनिषा शिंदे या शनिवारी {दि. १२ } सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात जात असताना रस्त्यावर चक्कर येऊन पडल्या. त्यामुळे त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. यावेळी उपचार सुरु असताना मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. आज पहाटे {दि. १३ } पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पती दिपक, दोन मुले सार्थक (वय : ११) आणि स्वरुप (वय : ४), सासू, सासरे, आईवडील असा परिवार आहे. दरम्यान, दुपारी आश्वी खुर्द येथील प्रवरातीरावर त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांसह हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दरम्यान, सार्थक आणि स्वरुप या चिमुकल्यांना कोवळ्या लहान वयात मातृत्वाला मुकावे लागले. या भावनेमुळे उपस्थितांच्या भावना दाटून आल्याने अनेकांना हुदंके अनावर झाले.