जलालपुर येथे एक कोटी तीन लाख रुपये निधीतून बंधारा तसेच 14 वित्त आयोग निधीतून 10 लाख रुपये निधीच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री यांनी केला. भाजपाचे नेते धनराज कोपनर, उपसरपंच जयश्री कासारे, लालासाहेब काळे, किसन कासारे, नारायण काळे, नानासाहेब झगडे, प्रमोद पावणे, भागवत पाटील, कल्याण धोंगडे, बापु खुरंगे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना धनराज कोपनर म्हणाले की, जलालपुर येथे अनेक कामे प्रलंबित होती. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येथील विविध प्रश्न मार्गी लागले आहेत. बंधारे, रस्ते अशी कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास होत आहे.पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी ताजु-सिध्दटेक फाटा या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असुन लवकरच काम सुरु होईल अशी माहिती दिली. तुम्ही काम मागा तात्काळ मंजुरी देतो असेही शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांमुळे प्रलंबित प्रश्न मार्गी : धनराज कोपनर
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:15
Rating: 5