राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे कॉलेज ऑफ बी. फार्मसीचे उपप्राचार्य प्रा. महेश रामराव शेरकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांची औषधनिर्माणशास्त्र विषयात पीएचडी नुकतीच प्रदान करण्यात आली. त्यांनी डिसाईन ऍण्ड डेव्हल्पमेंट ऑफ नॉव्हेल ड्रग डिलेव्हिरी सिस्टिमस फॉर ऍन्टी व्हायरल एजंटस या विषयांवर प्रबंध सादर केला होता. तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून स्वीकारण्यात आलेला आहे. त्यांना प्राध्यापक डॉ. अशोक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ व आयुर्वेद, नर्सिंग व फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रा. महेश शेरकर यांना पीएचडी प्रदान
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:59
Rating: 5