ग्राहक स्वरोजगार मिशन तरुणांसाठी फलदायी : सुधीर राळेभात.
जामखेड / ता.प्रतिनिधी । 20 ः
देशात तरुणांच्या हाताला काम मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. त्यावर ग्राहक स्वरोजगार मिशन लाभदायी ठरत आहे. तरुणांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधीर राळेभात यांनी केले आहे. ग्राहक स्वरोजगार मिशन डीएनआर कंपनीच्या बैठकीत मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना म्हणाले.
येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात नुकतीच ग्राहक स्वरोजगार मिशन डीएनआरएस कंपनीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात मार्गदर्शन करताना सुधीर राळेभात बोलत होते. यावेळी बाजार समितीचे संचालक मकरंद काशिद, विनायक राऊत, कंपनीचे डायमंड डायरेक्टर शरद ताठे, आनंद सपाटे, गणेश गवसणे, अविनाश बोधले, पोपटराव जगदाळे, तात्याराम फुले, धनराज पवार, योसेफ पंडीत, रत्ना कांबळे, सुलताना शेख, चंद्रकांत साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद ताठे म्हणाले की, देशातील तरूणवर्ग दिशाहीन झाला असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत.
तालुक्यात ग्राहक स्वरोजगार मिशन ही एक डीएनआरएस कंपनीची मोठी चळवळ सुरू झाली असून बचत आणि रोजगाराची संधी या माध्यमातून प्राप्त झाली आहे, मोठ्या प्रमाणात ही माहिती तरूणांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या बैठका तालुकाभर घेण्याचा संकल्प असल्याचेे सुधीर राळेभात यांनी सांगितले. यावेळी आष्टी, पाटोदा, करमाळा आदी तालुक्यातील ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन गणेश गवसणे यांनी तर, मकरंद काशीद यांनी आभार मानले.