Breaking News

जागतिक मातृ दिन


मराठी वर्णमालेतील पहिले चार वर्ण मिळून शब्द तयार होतो "आई". श्री काराच्या नंतर मूल शिकतो तो शब्द "आई". ती निर्माती आहे,ती कुणाची ही असो, पशु-पक्षी किंवा मानवाची ती सजग आहे, ती दात्री आहे म्हणून ती थोर आहे.आपल्या जन्मदात्या आई इतकीच सर्वांची एक आई आहे ती म्हणजे 'मातृभूमी'. ती सर्वसमावेशक आहे. कोणतेही भेद तिला अमान्य आहेत. तिच्या वर्णापेक्षा तिचे गुण विलक्षण सुंदर आहेत. ती सहनशीलता अन समृद्धतेचे प्रतिक आहे.

संस्कृत मध्ये 'मा' शब्दाचे अनेक अर्थ आहेत त्यातील एक म्हणजे लक्ष्मी आणि 'ता'म्हणजे तारणारी म्हणून ती आपली 'माता' आहे. जी आपल्याला समृद्धता देते अन तारते.

तिन्ही लोकांत जिची महती
त्या मातेचे गुण गाऊ किती?
दूर गेली तरी आठवते वारंवार
कसे फेडता येतील तिचे उपकार !!