Breaking News

मंत्रालयातील साडेतीनशे वाहनचालकांची आरोग्य तपासणी


मुंबई : रस्ते सुरक्षा पंधरवड्यानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंत्रालयातील वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 350 वाहनचालकांनी या शिबिरातसहभाग घेतला.

या शिबिरात जे. जे. रुग्णालयातील 20 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नेत्र तपासणी तसेच रक्तदानासाठी काम केले. या शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकाम) अजित सगणे यांच्या हस्ते झाले. मुख्य अभियंता व सहसचिव (बांधकाम) प्रकाश इंगोले, अधीक्षक अभियंता अरविंद सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) रा. भि. कोळी आदी यावेळी उपस्थित होते.