Breaking News

माजी सैनिकांचा जलसंधारणासाठी उत्सफुर्तपणे श्रमदान


अहमदनगर - सिमेवर शत्रूंशी लढा दिल्यानंतर सेवा निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी दुष्काळी संकटाला हद्दपार करुन गाव पाणीदार करण्यासाठी जलसंधारणाच्या कामात उत्सफुर्तपणे श्रमदान केले. पाणी फाऊंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या नगर तालुक्यातील कौडगावात मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित श्रमदान उपक्रमात जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माजी सैनिक असलेल्या सदस्यांनी सहभाग नोंदवला.

लोकसहभागातून जलसंधारणासाठी उत्कृष्ट काम करणारे कौडगावचे सरपंच धनंजय खर्से व नियोजन अधिकारी किरण गावडे यांचा जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांच्या हस्ते तिरंगा ध्वज देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उप जिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पंडितराव लोणारे, आत्माचे संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे, उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, कृषी उपविभागीय अधिकारी सुधाकर बोर्‍हाळे, नायब तहसिलदार वैशाली आव्हाड, महेश महाराज देशपांडे आदि उपस्थित होते.

सैनिक सिमेवर शत्रुंशी जसा लढा देतात त्याप्रमाणे दुष्काळासारख्या संकटावर मात करण्यासाठी माजी सैनिक जलसंधारणाच्या श्रमदानासाठी पुढे सरसावले आहे. संघटनेच्या माध्यमातून माजी सैनिक इतर गावात देखील श्रमदान करणार असल्याची माहिती विजय बेरड यांनी दिली. श्रमदानात संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पालवे, खजिनदार भाऊसाहेब कर्पे, सचिव जगन्नाथ जावळे, सहसचिव निवृत्ती भाबड, विश्‍वस्त संभाजी वांढेकर, संतोष मगर, दिगंबर शेळके, बन्सी दारकुंडे, गणेश पालवे, आबासाहेब पवार, विजय बेरड, शुभम पालवे, माजी सैनिक संघटना पळवेचे अध्यक्ष आंबादास तरटे, पारनेर तालुका माजीसैनिक संघटनेचे शहदेव घनवट आदिंसह माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.