संगमनेर शहर पोलिसांनी सातशे किलो गोमांस पकडले
संगमनेर : संगमनेर शहर पोलिसांनी काल शनिवार दि. १९ रोजी रात्री केलेल्या कारवाईत सातशे किलो गोमांससह एकास ताब्यात घेऊन अटक केली असल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील भारतनगर भागात कुरैशीवाडा याठिकाणी अवैध गोवंश सुरु असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारावरून पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता यावेळी आरोपी जहीर अन्वर कुरैशी वय-२७ याला सातशे किलो गोमांसासह धारदार सूरी व दोन चाकू यांसह ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. हस्तगत केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत हि सत्तर हजार नऊशे रुपये आहे.
संगमनेर शहर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात गोवंश हत्या बंदी कायदा व आर्म्स ऍक्ट प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास हेकॉ. अण्णा वाघ करीत आहे.
