साईआदर्श मल्टीस्टेटमध्ये वीज बिल भरणा केंद्र
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटीला वीज वितरण कंपनीची वीज बिल स्विकारण्यास मान्यता मिळाली आहे. या अधिकृत वीज बिल भरणा केंद्राचा शुभारंभ नाशिक परिमंडळ विभागाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर व नाशिक विभागाचे सहायक महा व्यवस्थापक राकेश बाविस्कर यांचे हस्ते नुकताच झाला. अध्यक्षस्थानी मल्टिस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे होते.साई आदर्शचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी प्रास्तविक केले.
मुख्य अभियंता ब्रिजपाल सिंह म्हणाले, साई आदर्श मल्टिस्टेट संस्थेच्या या सुविधेचा वीज ग्राहकांना व विज वितरण कंपनीलाही फायदा होईल. साईआदर्शने अर्थकारणाबरोबरच सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जपण्याचे केलेले काम उल्लेखनीय आहे.महाव्यवस्थापक राकेश बाविस्कर यांनी शुभेच्छा देऊन साईआदर्श ने आणखी जास्तीतजास्त शाखा सुरु करुन त्याठिकाणी वीज बिल भरणा सुविधा उपलब्ध करून द्यावी.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी पतसंस्थाचे ग्रामीण भागातील योगदान विषद करून साई आदर्शने वीज बिल भरणा केंद्र सुरू करून प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकल्याचे सांगितले. याप्रसंगी चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड, श्रीरामपूर विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बंड, उपकार्यकारी अभियंता अशोक संसारे, देवळाली उपविभाग उपकार्यकारी अभियंता प्रदीप देहरकर, बाभळेश्वर उपकार्यकारी अभियंता, कमलाकर दंडवते, विभागीय लेखापाल प्रवीण गटकळ, उपविभागीय अभियंता अक्षय विखे, संचालक डॉ. विलास पाटील, किशोर थोरात, विष्णु गिते, अविनाश साबरे, दीपक त्रिभुवन, आबासाहेब वाळुंज, अॅड. अर्जुन मुसमाडे, दीपक भावसार, दत्तात्रय कदम, गोपाल शिंदे, पुजांभाऊ गांडुळे, प्रदीप गरड, अन्सार शेख, मनोज ईनामदार, अनिल वाघमारे, एकनाथ काळे, अक्षय कपाळे, बाळासाहेब सोनावणे, भगवान डोंगरे, जनरल मॅनेजर सचिन खडके, शाखाधिकारी याकूब शेख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
