Breaking News

अनधिकृत फटाके साठविणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी


कोपरगाव : शहरासह जिल्हयात चोरटयांनी सपाटा लावला असताना शहराच्या अनेक प्रभागांमध्ये रात्री १० ते १२ च्या सुमारास अचानक फटाक्यांचा आवाज येत आहे. त्या आवाजाने झोपेत असलेली लहान मुले, वयोवृध्द नागरिक, हृदयविकाराचे रुग्ण खडबडून जागे होतात आणि घाबरुन जातात. त्यामुळे शहरातील अशा अनधिकृत फटाके साठविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. 
शहरात रात्री १० वाजेनंतर वाद्य वाजवण्यास बंदी आहे. असे असतांना शहरात गावठी कट्टे सापडत आहेत. रात्री अपरात्री वाजणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाचा गैरफायदा घेऊन चोरटे चोरी व दरोड्यासारखे गुन्हे करण्याची शक्यता आहे.