Breaking News

मा.खा.तुकाराम गडाख निकटवर्तीयांच्या भेटीला


सोनई -  माजी खासदार तुकाराम गडाख गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या कार्यक्रमात नागरिकांच्या व जुन्या कार्यकर्त्यांंसह निकटवर्तीय घेत असलेल्या भेटीगाठी मुळे नेवासा विधानसभा मतदारसंघात राजकिय वर्तुळात तर्कविर्तकांना उधाण आले आहे.

गडाख हे लग्न, दशक्रिया विधी, वास्तुशांती, जागरण गोंधळ, साखरपुडा असे विविध प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होऊन संवाद साधताना दिसत आहे. त्यामुळे ते आगामी विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्यासाठी अनेक तरुण मंडळी त्यांना पुढे करू पाहत आहे. त्यांच्या या भेटीमुळे विविध पक्षात अस्वस्थता आहे. नेवासा-शेवगाव या मतदारसंघात त्यांचे नेतृत्व जनतेने स्विकारले होते. त्यामुळे त्यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.