Breaking News

वारकर्‍यांना केंद्रबिंदू मानून पंढरपूरच्या आषाढी वारीची तयार करावी - गिरीश बापट

पुणे : पंढरपूरची आषाढी वारी हा महाराष्ट्रातील जनतेच्या श्रद्धेचा विषय आहे. राज्यातील कानाकोपर्‍यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात. या वारकर्‍यांना कें द्रबिंदू मानून पंढरपूरच्या आषाढी वारीची तयारी करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिल्या.


विधान भवनातील सभागृहात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी वारी पूर्वतयारी विषयक बैठक पार पडली. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री विजयकु मार देशमुख, सातार्‍याचे पालकमंत्री विजय शिवतारे, पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, आमदार सर्वश्री बबनराव शिंदे, प्रशांत परिचारक, विजय काळे, मकरंद पाटील, राहूल कूल, भीमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर,पुणे मनपाचे आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण कीडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ङ विकास ढगे-पाटील, संत तुक ाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा प्रमुखांसह विविध दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री.बापट यांनी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकार्‍यांकडून आषाढी वारीच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. तिन्ही जिल्ह्यातील अधिकार्‍यांनी तयारीचे सादरीकरण केले.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, पालखी मार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे या कामाला गती देण्यासाठी तिन्ही जिल्ह्यातील अधिकार्‍यांनी भूसंपादनाची कामे वेगाने करावीत. भूसंपादन करताना बाधित शेतकर्‍यांना योग्य व तातडीने मोबदला देण्यात यावा. त्याच बरोबर आळंदी-देहू मार्गाच्या दुरूस्तीचे क ाम तातडीने करून घ्यावे. पालखी मार्गावरील रस्त्याच्या दुरूस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घ्यावीत. तसेच पालखी तळांच्या ठिकाणी सपाटीकरण करून तात्पुरत्या स्वरू पात पुरेशा प्रमाणात शौचालये बांधण्यात यावीत. पालखी तळाच्या ठिकाणी पुरेशा पाण्याची व वीजेची सोय करण्यात यावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वारीच्या मार्गावर प्लास्टिक पत्रावळ्या, प्लास्टिक ग्लास, प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणावेत, यासाठी लोकांच्यात जनजागृती करावी.
वारीच्या कालावधीत वारकरी व भाविकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने सर्व पाण्याचे उद्भव तपासण्यात यावेत. तसेच आरोग्य विभागाने सर्व ठिकाणी सज्ज राहण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस विभागाने सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पंढरपूर आषाढी वारी यशस्वी पार पाडण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीला शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.