पीएमपीच्या नव्या गाड्यांची तपासणी
पुणे - पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात नव्याने आल्याने काही गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाले आहेत. इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम योजना, डिजीटल फलक, दरवाजे या यंत्रणा काम करत नसून त्याविरोधात तक्रारी येत होत्या. यामुळे नव्या गाड्यांदेखील समस्येंच्या गर्तेत सापडल्याने सर्व नव्या गाड्यांची तपासणी करून यंत्रणा क ार्यान्वित करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.पीएमपीने जागतिक महिला दिनी महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू केली.
तसेच नव्याने 163 मिडीबस खरेदी करून त्या मार्गांवर सुरू केल्या. मात्र, काही दिवसातच या नव्या गाड्यांच्या तांत्रिक अडचणींना सुरवात झाली. डिजीटल बोर्ड, दरवाज्यांमध्ये बिघाड अशा प्रकारच्या तक्रारी नागरिकांकडून येऊ लागल्या. यामुळे संबं धित बस कंपनीचे अधिकारी आणि पीएमपीचे अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असून तपासणीचे काम सुरू करण्यात आल्या आहेत. बस कंपनीच्या अधिकार्यांना गाड्यांची तपासणी करून यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिका तथा अध्यक्षा नयना गुंडे यांनी सांगितल्या.
