Breaking News

येडीयूरप्पा यांनी सर्वात कमी दिवसांचा मुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड तोडला - अजित पवार


पुणे - महाराष्ट्रात सर्वात जास्त कालावधीचे मुखमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी काम पाहिले तर येडीयूरप्पा यांनी सर्वात कमी दिवसांचा मुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड तोडून टाकला, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकी दरम्यानच्या भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 जून रोजी पुणे शहरात राष्ट्रीय मेळावा होणार आहे. त्यासाठी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, कर्नाटक विधानसभेकडे सगळया देशाचे लक्ष लागले होते. जर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेले नसते तर आता तेथील चित्र वेगळेच राहिले असते. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी स्थनिक खासदारांना काहीही करून आपलं सरकार आलंच पाहिजे अशी तंबीच दिली होती.