महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शिफारशींना मान्यता संचालक संशोधक डॉ. गडाख यांचा पुढाकार
राहुरी प्रतिनिधी - महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषि विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे तीन दिवसीय संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची बैठक नुकतीच पार पडली. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या मार्गदर्शनाखाली या कृषि विद्यापीठाच्या नवीन वाण आणि तंत्रज्ञान शिफारशी सादर करण्यात आल्या. या सर्व शिफारशींना या विद्यापीठाचे संचालक, संशोधक डॉ. शरद गडाख यांनी यासाठी पुढाकार घेतला.
दरम्यान, या बैठकीचे उदघाटन गुजरात येथील कामधेनू विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एम. सी. वार्ष्णेय यांचे हस्ते झाले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी परभणी येथील वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वर्लु होते. याप्रसंगी विद्यापीठांचे कुलगुरु अनुक्रमे डॉ. के. पी. विश्वनाथा (राहुरी), डॉ. टी. भट्टाचार्य (दापोली), डॉ. व्ही. एम. भाले (अकोला), महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रविंद्र जगताप, कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. एस. जहागीरदार आदी उपस्थित होते.
या बैठकीत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सहा वाण, एक कृषि यंत्रे अवजारे, एक वनस्पती जैविक ताण सहन करणारे श्रोत आणि ४० पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. यामध्ये
ऊस-व्हीएसआय १२१२१, हरभरा-फुले जी- ०४०५, कपाशी-फुले चेतना, केळी-फुले प्राईड, पपई-फुले विजया, चेरी टोमॅटो-फुले, जयश्री हे वाण प्रसारित करण्यात आले. तसेच फुले कैरी फोडणी यंत्रदेखील प्रसारित करण्यात आले. त्याचप्रमाणे जैविक ताण सहन करणारे स्त्रोत नोंदणी प्रस्ताव, तुडतुड्यांचा प्रादूर्भाव, भौतिक आणि रासायनिक गुणधर्मावरुन कपाशीचा जीआएसव्ही-२७२ याची तुडतुडे या किडीस प्रतिकारक्षम स्त्रोत म्हणून शिफारस करण्यात आली.