Breaking News

माेदी लाेकसेवक नव्हे, तर सत्तासेवक बनलेत

वृत्तसंस्था। नवी दिल्ली
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र माेदी हे सामान्य नागरिकांबद्दल बेजबाबदार असल्याची टीका केली आहे. माेदींचा लाेकसभा मतदारसंघ वाराणसीत पाच दिवसांपूर्वी उड्डाणपुलाचा एक भाग काेसळून झालेल्या दुर्घटनेत १६    जणांचा मृत्यू झाला; परंतु लाेकसेवक म्हणवून घेणारे माेदी कर्नाटकातील सत्तेच्या खेळात मग्न हाेते. त्यातून त्यांनी या घटनेतील पीडितांची स्थिती जाणून घेण्याचीही तसदी घेतलेली नाही. त्यामुळे ते अाता सत्तासेवक बनले अाहेत, अशी टीकाही काँग्रेसने रविवारी केली. 


काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले की, वाराणसीत १६ जण ठार, तर अनेक जण जखमी झाले; परंतु घटनेला पाच दिवस हाेऊनही माेदींना मृतांचे नातेवाईक व जखमींची विचारपूस करण्यास वेळ मिळाला नाही. स्वत:ला उत्तर प्रदेशाचे सुपुत्र म्हणवणाऱ्या माेदींना अापल्याच मतदारसंघांतील गरीब जनतेची स्थिती जाणून घ्यावीशी वाटत नाही. ते त्यांना सापत्न वागणूक देत अाहेत.