Breaking News

मातेसह भूमातेची पूजा करण्याची संकल्पना आदर्श : सुपेकर


कर्जत :आज समाजात संस्कार अत्यंत महत्वाचे असून ते देणार्‍या आपल्या मातेचे व भूमातेची पूजा करण्याची संकल्पना मुलासमोर आदर्श निर्माण करणारी असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी श्रमदान चळवळीत व्यक्त केले. याठिकाणी मातृदिनानिमित्त आयोजीत पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत गावांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जत मधील सामाजिक संघटनांनी सुरू ठेवलेल्या श्रमदान चळवळीत आज खंडाळा येथे मदर्स डे चे औचित्य साधून भू मातेचे व आपल्या मातेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी प्रथम श्रमदान चळवळीतील अ‍ॅड. नवनाथ कदम, अ‍ॅड नवनाथ फोंडे, डॉ. राजेंद्र खेत्रे, विनोद बोरा व भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अभय बोरा यांचेसह महिलाच्या हस्ते भूमातेचे पूजन करून वंदन करण्यात आले. तर ज्येष्ठ महिला लीलाबाई बोरा, विठाबाई बोरा व मंगलबाई खाटेर यांचे पूजन अनुक्रमे अभय बोरा, आशिष बोरा, धन्यकुमार खाटेर यांचे हस्ते करण्यात आले. उपस्थित मुलांनीही आपल्या मातेचे पूजन केले. यावेळी भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प संचालक आशिष बोरा यांनी या उपक्रमाची संकल्पना विशद करताना श्रमदानाबरोबर श्रम संस्कार देण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे म्हटले, तर तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी श्रमदान व जलाचे महत्व विशद करताना आज समाजात आईवडीलांप्रति निर्माण होऊ लागलेल्या दुराव्यामुळे अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगताना जैन संघटना आयोजीत कार्यक्रमामुळे मुलांवर चांगले संस्कार होतील असेही म्हटले. यावेळी योगेश कोठारी, भूषण देसरडा, यश बोरा, सचिन मुनोत, अनिकेत खाटेर, यश नहार यांचेसह नीरज कोठारी, साजन कटारिया, शुभम कोठारी, महेश कोठारी, सुयोग कटारिया, संजय गोडसे, खंडाळाचे ग्रामसेवक नवनाथ गायकवाड, डॉ. कांचन खेत्रे, निर्मला खराडे, ज्योती बोरा, सुनंदा बोरा, अनिता बोरा, सुरेखा मुनोत, स्वाती बोरा, गीता बोरा आदी सहभागी झाले होते.