भाजपने सामाजिक, आर्थिक अस्थिरता निर्माण केली
सोलापूर - केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने चार वर्षांमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणारे एकही विधायक कार्य केले नाही. आश्वासनांची खैरात, दिशाभूल, सामाजिक व आ र्थिक अस्थिरता निर्माण केली आहे. लोकसभा निवडणुक तयारी काँग्रेसने सुरू केली असून राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा निर्धार आहे, असे पक्षाचे निरीक्षक आ. शरद रण पिसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून ’व्हिजन 2019’ अभियान अंतर्गत कार्यकर्त्यांना पक्षाची ध्येयधोरणं, सोशल मीडियाचा वापर, केंद्र व राज्यशासनाच्या चुकीच्या क ार्यपद्धतीच्या बाबत मार्गदर्शनासाठी अकलूज व सोलापुरात कार्यकर्ता शिबिर आयोजिल्याची माहिती त्यांनी दिली.
रणपिसे म्हणाले, भारिपचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व अद्याप प्रगल्भ नसल्याची टीका केली होती. त्याबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर रणपिसे यांनी अॅड. आंबेडकर यांची भूमिका अनेकदा भाजपसाठी फायद्याची ठरते. ते भाजप विरोधी असल्यास त्यांनी समविचारी पक्षांच्या सोबत यावे, असे त्यांनी सांगितले.
