Breaking News

उजनी धरण मृतसाठ्यात गेले


सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी वरदायी असलेले उजनी धरण मृतसाठ्यात गेले असल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा उणेमध्ये गेला. उजनी धरणाचा पाणीसाठा क मालीचा खालावला असून धरणामध्ये 0.13 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता, तर उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये 0.07 टीएमसी एवढा शिल्लक आहे.मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी धरणामधील पाणीसाठा समाधानकारक राहिला. मागील वर्षी आज रोजी धरणातील पाणीसाठा उणे 28.37 टक्के एवढा होता. 

गतवर्षी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले होते. त्यामुळे उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांना यावर्षी पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आलेली नाही. उजनी धरण यावर्षी पावसाळ्याच्या तोंडावरची उणे मध्ये जात असल्यामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.दरम्यान उजनीच्या कालव्या मधून उजनी उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रामधील सिंचनासाठी उन्हाळी हंगामाचे दुसरे आवर्तन दि.8 मे रोजी सोडण्यास सुरुवात झालेली होती व 8 मे रोजी धरणांमध्ये 8 टीएमसी म्हणजे 14.93 टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा होता हा पाणीसाठा हळूहळू कमी होऊन उजनी धरणामधील पाण्याची पातळी चिंताजनक स्वरुपाची झालेली आहे.