Breaking News

पिस्तुलाच्या धाकाने इंजिनिअरचे अपहरण, 14 लाख 30 हजार रुपयांची खंडणी


पुणे - कार अडवून पिस्तुलाच्या धाकाने इंजिनिअर व त्याच्या चालकाचे अपहरण करून तब्बल 14 लाख 30 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. बी. टी. कवडे रोडवरील सोपानबाग येथून अपहरण करून कात्रज घाटात नेले आणि या ठिकाणी नातेवाइकांना बोलावूनपैसे उकळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अपहरण झाल्यानंतर पैशांसाठी वाट पाहत थांबलेल्या आरोपींना बीट मार्शलने हटकले त्यावेळी आरोपींनी त्यांना 2 लाख 40 हजार रुपये देऊन सुटका केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे. 

या प्रकरणी राहुल कटकमवार (37) यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या मा हितीनुसार, कटकमवार हे इंजिनिअर असून, ते एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. बी. टी. कवडे रोडवरील सोपानबाग येथे आल्यानंतर अज्ञातांनी त्यांच्या कारला दुचाकी आडवी लावली. तसेच दुचाकीवरून आलेल्या चार व्यक्ती कारमध्ये जबरदस्तीने घुसल्या. पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी कारचा ताबा घेतला. तसेच कटकमवार यांना जिवे मारण्याची धमकी देऊ.