Breaking News

नूतन नगराध्यक्षांनी स्विकारला पदभार


कर्जत : कर्जत नगरपंचायतच्या नूतन नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे यांनी काल पदभार स्विकारला. प्रथम महिला नगराध्यक्षांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगे बाबा या महापुरूषांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करण्यात आले. 

यानंतर प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी त्यांचा सत्कार करत पदभार सुपूर्द केला. यावेळी मा. उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, विरोधी पक्षनेत्या पूजा म्हेत्रे, मोनाली तोटे, वृषाली पाटील, हर्षदा काळदाते, नीता कचरे, मनीषा सोनमाळी आदी नगरसेविकांसह माजी ग्रा.पं. सदस्य संजय भैलुमे, रिपाईंचे जिल्हाकार्याध्यक्ष भास्कर भैलुमे, नितिन तोरडमल, अनिल गदादे, नंदकिशोर भैलुमे, रिपाईचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, अजय भैलुमे, निशिकांत भैलुमे, विशाल काकडे, प्रणव भैलुमे, भाऊसाहेब तोरडमल, किरण पाटील, अनुज काळदाते, सौरभ मांढरे, मिलिंद आखाडे, आदींसह नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. सर्व कर्मचारी यांच्या वतीने नूतन नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे यांचा सत्कार करण्यात आला.