Breaking News

‘राज्य फोकस पेपर’ची गावपातळीपर्यंत प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना


मुंबई : नाबार्डच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी या वर्षाच्या तयार करण्यात आलेल्या ‘राज्य फोकस पेपर’ची गावपातळीपर्यंत प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत. जलसंधारणासाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पातून पाण्याचा वापर अधिक परिणामकारकपणे करण्यासाठी या सर्व प्रकल्पांचे डिजिटायजेशन करण्यासाठी नाबार्डने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे नाबार्डच्यावतीने राज्य कर्ज परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु. पी. एस. मदान, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस. संधू, नियोजन विभागाचे प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती, राज्य बँकर्स समितीचे अध्यक्ष रवींद्र मराठे यावेळी उपस्थित होते.