महापौर आपल्या दारी’मधून मुक्ता टिळक यांचा नागरिकांशी संवाद
पुणे, दि. 06, मे - महापौर आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे सोमवारपासून (7 मे) सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधून महापालिकेशी संबंधित समस्यांचे निवारण करणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.विकास आराखड्याला मंजुरी, शिवसृष्टी, मेट्रो, स्मार्ट सिटी, बीआरटी, सायकल धोरण, समान पाणीपुरवठा, नदी सुधारणा, रामटेकडी येथे कचरा प्रकल्प, इ-लर्निंग, डीबीटी आदी पायाभूत प्रकल्पांना गती देऊन पुढील पाच वर्षांतील नियोजनबद्ध विकासाची दिशा निश्चित केली आहे.या विकास प्रकल्पांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोच विणे, नाविन्यपूर्ण कल्पना आणि सुचनांच्या माध्यमातून प्रशासनातील लोकसहभाग वाढविणे, विविध नागरी समस्या समजावून घेऊन त्यांचे निराकरण करणे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित क रण्यात आला आहे.पारदर्शक, गतीमान, विकासाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त सुशासन देण्यात आम्ही गेल्या वर्षभरात यशस्वी झालो आहोत, असा दावा महापौरांनी केला. महापालिकेतील पदाधिक ारी, नगरसेवक, अधिकारी, प्रशासन नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रयत्नांना या उपक्रमामुळे प्रोत्साहन मिळणार असल्याचेही त्या म्हणाल्या.येरवडा, कळस, धानोरी, ढोलेपाटील रोड, औंध-बाणेर, घोले रोड-शिवाजीनगर, कोथरुड, बावधन, धनकवडी सहकारनगर, सिंहगड रस्ता, वारजे-कर्वेनगर, हडपसर-मुंढवा, वानवडी- रामटेकडी, कोंढवा-येवलेवाडी, कसबा विश्रामबागवाडा, भवानी, बिबवेवाडी या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यकक्षेत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.7 मे ते 25 मे या कालावधीत संध्याकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत महापौरांसमवेत क्षेत्रीय कार्यालयांच्या कक्षेतील नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आपल्या भागातील नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी आणि शहराच्या विकासाला हातभार लावण्याच्या उद्देशाने पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.