Breaking News

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईत सोमवारी एकाच दिवशी दोन बैठका


मुंबई, दि. 13, मे - रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दोन महत्वपूर्ण बैठका येत्या सोमवार 14 मे रोजी मुंबईत आयोजित करण्यात आल्या असून या बैठकांना रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत. 

14 मे रोजी सायंकाळी 5 वाजता बोरिवली गोराई येथील हॉटेल बेव्ह्यू हॉलमध्ये उत्तर मुंबई ; उत्तर पश्‍चिम आणि उत्तर मध्य या तीन जिल्ह्यांच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच त्यानंतर सायंकाळी 7 वाजता चेंबूर पोस्टल कॉलनी येथील भगवानदिन शुक्ला सभागृह येथे ईशान्य मुंबई ; दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या तीन जिल्ह्यांच्या कार्यक र्त्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकांना रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत. येत्या 27 मे रोजी रिपाइंचे राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्व तयारीसाठी मुंबईत एकाच दिवशी दोन महत्वपूर्ण बैठकांना आठवले मार्गदर्शन करणार असल्याची माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.